Posts

रौद्रभीषण भीमाशंकर

Image
२००९ च्या जुलैमधली एका शुक्रवारची संध्याकाळ ! योगेश , अधिक , ललित , प्रशांत आणि मी जमलो होतो . खल चालला होता उद्या कुठे भटकंती करायची यावर . तसं मागचा ट्रेक ( रायगड ) करून ४-५ वर्षं झाली होती . त्यानंतर कुठेच फिरणं झालं नव्हतं . त्यामुळे मोठ्या हिरिरीने चर्चा चालली होती . तेव्हा आमच्यात फक्त ललितकडे कॉम्प्युटर , त्यामुळे त्याच्या घरी बसून इंटरनेटवर खूप शोधाशोध झाली , आणि ठरलं - भीमाशंकर ! खरंतर भीमाशंकर हा गणेशघाटाने खूप सोपा तर शिडीघाटाने त्यावेळी खूप अवघड ट्रेक होता . आणि तरीही आम्ही तोच निवडला होता , काहीतरी थ्रिलिंग करायचं होतं आम्हाला . सकाळी लवकर निघून आम्ही वेळेत खांडसला पोचलो . आता सुरु झाली गावातल्या लोकांकडे चौकशी . त्यांनीही सांगायला सुरुवात केली , शिडीघाटाच्या वाटेने लवकर जाऊ शकाल पण अवघड आहे , अपघात होऊ शकतो , तर गणेशघाट सोपा आहे पण ५ - ६ तास लागतील . पण आम्हाला आज कुछ तुफानी करायचं होतं . त्यामुळेच तर हा ट्रेक ठरला होता . आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं . प्रशां...