Posts

Showing posts with the label Astrophotography

चला आकाशगंगा टिपुया!

Image
२२ एप्रिल २०२३ च्या रात्री आमची डेहणेला पहिल्यांदा आकाशगंगा फोटोग्राफी ट्रिप झाली. अभिजित, अरविंद आणि मला अगदी हेवा वाटेल असे फोटो मिळाले. दुसऱ्या दिवशी अरविंदचा मेसेज आला, "अरे आपण तर आकाशगंगेचाच भाग आहोत, मग आपण त्याचा फोटो कसे काय काढू शकलो? आपण फोटो काढले त्यावर माझ्या मित्रांनी हा प्रश्न विचारलाय." हा प्रश्न खरेच कुतूहलाचा, पण आपण जसे सूर्यमालेत राहून बुध, गुरु, शुक्र, मंगळ, गुरु, शनी हे ग्रह बघू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या आकाशगंगेचा पट्टा आपण पाहू शकतो. अगदी साध्या डोळ्यांनीसुद्धा, काही अंशी. विश्वात असंख्य आणि अफाट अशा दीर्घिका आहेत. या दीर्घिका सर्पिलाकार किंवा लंबवर्तुळाकार असतात. त्या दिसताना सपाट भासत असल्या तरी अशा सपाट चकतीची जाडी काही शे ते काही हजार प्रकाशवर्षे असू शकते. आपली सूर्यमाला ही अशाच एका सर्पिलाकार दीर्घिकेचा भाग आहे, तिचं नाव आकाशगंगा. या आकाशगंगेचा व्यास १,००,००० प्रकाशवर्षे असून तिच्या केंद्रापासून आपली सूर्यमाला दोन तृतीयांश अंतरावर आहे. हे अंतर जवळपास ३०००० प्रकाशवर्षे आहे. आकाशगंगेची केंद्राजवळ जाडी ५००० प्रकाशवर्षे असून कडेला ती २००० प्रकाशवर्षे...