Posts

Showing posts from December, 2022

जंगली डॉक्टर

Image
असं नाव ठेवायला कारणही तसंच आहे. आमचा कोकणातला पक्षीनिरीक्षणाचा दौरा ठरला. डॉक्टर आम्हाला गाईड म्हणून लाभणार होते. अभिजित पावसाळ्याच्या आधीच त्यांच्यासोबत फिरला होता. त्यामुळे त्याला त्यांच्या कौशल्याचा अनुभव होताच. म्हणून आता पावसाळा उलटून गेल्यावर नोव्हेंबरमध्ये ही ट्रिप ठरली. डॉक्टरांच्या मताने तळकट, कोलझर, झोळंबे आणि नंतर जमल्यास तिलारीमध्ये जायचे पक्के झाले. कोलझरमध्ये राहण्याची जागा पक्की झाली आणि मग गाडीची तिकिटेसुद्धा. १७ नोव्हेंबरला वालावलमध्ये पोचलो आणि १८ नोव्हेंबरच्या पहाटेच डॉक्टरांची गाडी आम्हाला न्यायला लक्ष्मीनारायण मंदिराजवळ हजर. गाडीत बसून निघत नाही तोच त्यांनी गाडी चालवत, आजूबाजूला नजर टाकत दिसणाऱ्या पक्षांची नावे सांगायला सुरुवात केली. खरंतर रस्त्याच्या कडेने दिसणारे पक्षी हे नेहमीचेच, पण तरीही ते मोठ्या उत्साहात सांगत होते. बांद्याहून गाडी जेव्हा तळकटकडे वळली तेव्हा त्यांची नजर आणखी तिक्ष्ण झाली. आणि तळकट उद्यान ओलांडून जेव्हा आम्ही खडपडे घाटाकडे वळलो तेव्हा तर त्यांचे कानही तिक्ष्ण झाले. जंगलातला डांबरी रस्ता जिथे संपतो, तिथे गाडी लावून आम्ही चालत पुढे जाऊ लागलो त