Posts

भैरवगड-घनचक्कर-गवळदेव-मुडा-कात्राबाई - एक तंगडतोड ट्रेक - १

Image
काही वर्षांपूर्वी भंडारदरा lakeside camping केलं होतं . तेव्हा त्याच्या आजूबाजूचे डोंगर म्हणून घनचक्कर , गवळदेव यांची नावं कळली होती . कुतूहल होतंच , पण कल्पना नव्हती की या डोंगरांवरसुद्धा ट्रेकिंग होत असेल . अगदी हल्लीहल्ली सोशल मिडिया मुळे इथल्या ट्रेकिंगच्या वार्ता कळत होत्या . तरीही ते किती कठीण असेल , रॉकपॅच असतील का हे प्रश्न होतेच . जसं जास्त कळत गेलं तशी ओढ आणखी वाढू लागली होती . पण योग काही येत नव्हता . नाही म्हणायला , मागे एकदा फक्त कात्राबाईचा ट्रेक केला होता . तरी या संपूर्ण रांगेचं आकर्षण होतंच . बहुदा हा रेंज ट्रेक व्हायचा योग होता , म्हणून बाकीचे प्लॅन रद्द होत होते . म्हणून जेव्हा परागने शिरपुंजेचा भैरवगड - घनचक्कर - गवळदेव - मुडा अशा रेंज ट्रेकची बातमी दिली तेव्हा दुसऱ्याच दिवशी होकार कळवून टाकला . रेंज ट्रेक असल्याने लागणारं सामान परागने कळवलं . नेहमीचे कपडे , पाणी , टॉर्च सोडता टेंट आणि जेवणाची भांडी घ्यायची होती . खरंतर मोठी बॅग नसल्याने मी ट्रेकमधला ...